Toggle Navigation
Politics
Home
(current)
Gallery
Blog
About
Enquiry
Contact
नागपूर बुटीबोरी पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र संघटनेतर्फे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
बुटीबोरी : बुटीबोरी पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र संघटनेतर्फे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांप्रती आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे पोलीस मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच बुटीबोरी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि पोलीस-नागरिक यांच्यातील स्नेहाचे नाते अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
latest news
-
Read More
-
Read More
-
Read More
-
Read More